डीवाय पाटील विद्यापीठात स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रमाचा शुभारंभ
schedule13 Aug 25 person by visibility 123 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठामध्ये स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रम सुरु केला आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी अभ्यासक्रम माहिती पुस्तिकेचे अनावरण करून याबाबतची घोषणा केली. भारतातील आघाडीची क्रीडा विज्ञान शिक्षण संस्था ‘प्रीहॅब 121 इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स’च्या सहकार्याने क्रीडा विज्ञानमधील पदव्युत्तर डिप्लोमा व ४ प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहेत.
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या सभागृहात स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रम शुभारंभ सोहळा साजरा झाला. यावेळी कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, 'प्रीहॅब 121' चे संस्थापक डॉ. लुकमान शेख व महेर जुमानी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ. अमृत कुवर रायजादे यांनी क्रीडा क्षेत्र व पूरक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा म्हणाले, कोल्हापूरसारख्या क्रीडा संस्कृती असलेल्या शहरात जागतिक दर्जाचे क्रीडा विज्ञान शिक्षण उपलब्ध होणार आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून नवे अभ्यासक्रम सुरु होत आहेत. ‘प्रीहॅब 121 अॅकेडमी’ चे संस्थापक डॉ. लुकमान शेख म्हणाले, “क्रीडा विज्ञानातील सैद्धांतिक ज्ञान व प्रत्यक्ष प्रशिक्षण यातील अंतर कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एस स्पोर्ट्स एज्युकेशन टॅलेंटचे संस्थापक मेहर जुमानी यांनी आभार मानले. डॉ. मैथिली पाटील यांनी सूत्रसंचालन तर डॉ. सोनिया लोहान यांनी नियोजन केले.
यावेळी सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, विद्यापीठ परीक्षा नियंत्रक अभय जोशी, आयक्युएसी संचालिका डॉ. शिंपा शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेरली, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैदयकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. उमराणी जे, डॉ. अजित पाटील, रुधीर बारदेस्कर, डॉ. आर. एस पाटील, डॉ. जे. ए. खोत, डी. एन. शेलार, केएमसी कॉलेज प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे, स्पोर्ट्स डायरेक्टर शंकर गोनुगडे, उपकुलसचिव संजय जाधव, जयदीप पाटील, अजित पाटील उपस्थित होते.