कॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरी
schedule14 Aug 25 person by visibility 24 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये साजरी करण्यात आली. डॉ. रंगनाथन यांचे प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ.वर्षा मैंदर्गी यांनी केले, कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागाने केले. यावेळी ग्रंथपाल प्रा. टी. एल. कांबळे यांनी रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा त्यांचे मनोगतात अधोरेखीत केला तर प्राचार्या डॉ. मैदार्गी यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात ग्रंथालयाचे महत्व स्पष्ट केले.