शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापूर शहर कार्यकारिणीची घोषणा
schedule13 Aug 25 person by visibility 33 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक (थोरात गट) संघाची कोल्हापूर शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.संघाच्या शहर नेतेपदी मनोहर सरगर, शहराध्यक्षपदी श्रीमती जयश्री महेश कांबळे, सरचिटणीसपदी संदीप तुकाराम सुतार यांची निवड करण्यात आली. राज्य उपाध्यक्षपदी डॉ. अजितकुमार पाटील तर सल्लागार समितीत सुनील शामराव कुरणे, सुनील रघुनाथ कोळी, नामदेव सर्जेराव वाघ, शामराव मा. सरगर यांचा समावेश आहे.
प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघाचे कोल्हापूर शहरातील २५ हून अधिक शिक्षकांनी नुकतेच थोरात गट प्रवेश केला. शिक्षक संघाचे एन. वाय. पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव रोडे-पाटील, शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, शिक्षक बँकेचे संचालक एस. व्ही. पाटील, बाळकृष्ण हळदकर, बाळासाहेब निंबाळकर, नंदकुमार वाईंगडे, पद्मजा मेढे, संघटनेचे रघुनाथ खोत, आनंदराव जाधव, विलास चौगुले आदींच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला. यानंतर शिक्षक संघ थोरात गटाच्या शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये शहर शाखेच्या सरचिटणीसपदी संदीप सुतार, उपाध्यक्षपदी रविंद्र संभाजी पाटील, सेजर शिवाजी पाटील, कार्याध्यक्षपदी संगीता शशिकांत खांडेकर, कोषाध्यक्षपदी श्रीकांत बाबासो हुबाले यांची निवड झाली. प्रसिद्धी प्रमुखपदी प्रियांका अमर चौगुले, प्रवेक्तापदी राजेंद्र बा.कांबळे, आयटी सेल प्रमुखपदी युवराज स.येरुडकर, संपर्कप्रमुखपदी वसिम राजेखान नायकवडी, ऑडिटरपदी मेघा संदीप सावंत आहेत. विभागप्रमुखपदाची जबाबदारी आर.जी किर्तीकर, प्रताप देवबा पाटील, गीतांजली अ. देवडकर, रुपाली कमते, स्नेहा रा. पाटील यांच्यावर सोपविली आहे.