जगातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत होण्याचा अधिकार – डॉ. विजय ककडे
schedule13 Aug 25 person by visibility 41 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वस्तू विकत घेण्याची गरज असते आणि तो स्वतःच्या आवडीनिवडी असलेल्या वस्तू विकत घेत असतो ज्या वस्तू आपण विकत घेतो त्याच वस्तूच्या कंपनीचे शेअर त्याने विकत घ्यावे आणि त्या कंपनीचे मालक व्हावे. जगातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत होण्याचा अधिकार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.विजय ककडे यांनी केले. देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये अर्थशास्त्र विभागामार्फत आयोजित"आर्थिक साक्षरता" या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्राचार्या मैंदर्गी म्हणाल्या, ‘आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे कारण पैशाशिवाय माणसाला जगता येत नाही. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एस .नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.बोथीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा.के.डी.दिंडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रा संग्राम पाटील आणि प्रा. ज्ञानेश्वर पाथरूट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.प्रवीण सोरटे यांनी आभार मानले. इंग्रजी विभागप्रमुख डॉ संतोष गवळी, डॉ.मुजावर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.