गोकुळ करणार आईस्क्रिम अन् चीज निर्मिती ! गडहिंग्लजला उभारणार म्हैस विक्री केंद्र !!
schedule14 Aug 25 person by visibility 30 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उत्कृष्ट चवीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची खासियत म्हणजे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाची उत्पादने. गोकुळ आता आईस्क्रिम आणि चीज तयार करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मार्केटिंग विभागाला या उत्पादनांच्या विक्रीसंबंधी नियोजनाच्या सूचना करण्यात आल्या. तसेच जातीवंत म्हैस विक्रीसाठी गडहिंग्लज येथे विक्री केंद्र केंद्र उभारण्याचेही ठरले. एनडीबीबीच्या सहकार्याने हे केंद्र होणार आहे. गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांन यासंबंधीची माहिती दिली. गोकुळच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी (१३ ऑगस्ट २०२५) गोकुळ शिरगाव येथील प्रकल्प येथे झाली. या बैठकीत नवीन उत्पादन निर्मिती संबंधी निर्णय झाला. गोकुळची विविध उत्पादने ग्राहकापर्यत पोहोचविण्यासाठी नियोजनाच्या सूचना मार्केटिंग विभागाला केल्या. येत्या दीड-दोन महिन्यापासून चीज आणि येत्या डिसेंबर-जानेवारी महिन्यापासून आईस्क्रिम विक्री करण्याबाबत चर्चा झाली. तसेच सप्टेंबर २०२५ पासून गडहिंग्लज येथे जातिवंत म्हैस विक्री केंद्र सुरू करण्याचे ठरले. परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदीसाठी ज्या पद्धतीने अनुदान दिले जाते तसेच अनुदान पंढरपुरी म्हैस खरेदीसाठी द्यावे अशा सूचना बैठकीत संचालकांनी मांडल्या आहेत.