आकाश एज्युकेशनलतर्फे अँथे २०२५ ची घोषण
schedule13 Aug 25 person by visibility 32 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड संस्थेने अँथे 2025 (आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम) – घोषणा केली आहे. ‘आकाश’ आता इन्व्हिक्टस एस टेस्ट नावाची एक शिष्यवृत्ती परीक्षा देखील सुरू करत आहे. ही परीक्षा आठवी ते बारावीवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाश इन्व्हिक्टस जेईई अॅडव्हान्सड तयारी कार्यक्रमात प्रवेश देण्यासाठी आयोजित केली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील पात्रता व शिष्यवृत्ती परीक्षा २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि सात सप्टेंबर २०२५ रोजी घेतली जाणार आहे. तीन तासांची ही परीक्षा (सकाळी दहा ते दुपारी एक) ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींमध्ये उपलब्ध असेल.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे सीईओ आणि एमडी दीपक मेहरोत्रा यांनी सांगितलं की, “अँथे हा आज भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी संधीचं प्रतीक बनला आहे. या वर्षापासून आम्ही 'इन्व्हिक्टस एस टेस्ट' देखील सुरू करत आहोत, जो स्कॉलरशिप आणि आकाश इन्व्हिक्टस कोर्समध्ये प्रवेशासाठी घेतला जाईल. अँथे २०२५ साठी नोंदणी सुरू झाली आहे. या पत्रकार परिषदेत असिस्टंट डायरेक्टर अमित कुमार शर्मा,ॲकॅडमीक हेड मेडिकल विंग चे अमजद अली, ॲकॅडमीक हेड इंजिनिअर विंगचे मनिष कुमार, ब्रॅंच मॅनेजर कोल्हापूर मोहन शिंदे, ब्रॅंच मॅनेजर सांगली कुमार चव्हाण उपस्थित होते.