संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या फुटबॉल संघाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
schedule01 Oct 24 person by visibility 253 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान वागड ग्लोबल स्कूल वाशी, मुंबई येथे झालेल्या सीबीएससी क्लस्टर फुटबॉल IX स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या १९ वर्षाखालील गटाने बाजी मारत अजिंक्यपद पटकावले. या संघाची भोपाळ मध्यप्रदेश या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत ८३ शाळा सहभागी झाल्या होत्या, ज्यामध्ये १९ वर्षाखालील गटात २८ संघांनी आपले कर्तृत्व दाखवले. अंतिम सामन्यात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या संघाला १-० ने हरवून सुवर्णपदक प्राप्त केले.
स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, आणि दिव-दमन या राज्यांतील सीबीएससी शाळा सहभागी झाल्या. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या वेदांत गायकवाड याला 'बेस्ट प्लेयर ऑफ टूर्नामेंट' आणि अखिलेश गाडगीळ याला 'गोल्डन बूट' मिळाले. प्रशिक्षक श्री दिनूसिंग यांचे मार्गदर्शन संघाला लाभले, तर दिग्विजयसिंग शिंदे हे संघाचे मॅनेजर होते.
संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सास्मिता मोहंती, आणि क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर यांनी खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.