+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसमरजितसिंह घाटगे गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार adjustशिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी, राधानगरीतून केपी, शाहूवाडीत सत्यजित पाटील adjustराजेश क्षीरसागरांनी घेतला अर्ज ! दौलत देसाई, मंजिरी मोरेंचाही समावेश !! adjustमुश्रीफ म्हणाले शक्तीपीठ महामार्ग रद्द ! सतेज पाटील म्हणतात सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक !! adjustडॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव adjust के. पी. पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश ! राधानगरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना !! adjustअमल महाडिक गुरुवारी अर्ज भरणार adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश
1001157259
1001130166
1000995296
schedule23 Oct 24 person by visibility 165 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. क्षीरसागर यांचा अर्ज त्यांच्या प्रतिनिधींनी नेला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी खजानिस वैशाली राजेश क्षीरसागर, कोल्हापूर शहरातील तरुण नेतृत्व दौलत देसाई, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. मंजिरी देसाई-मोरे यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. 
 दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर हे गेले दोन दिवस मुंबईत आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर महायुतीतंर्गत शिवसेना व भाजपाने दावा केला आहे. हा मतदारसंघ कोणाला यासंबंधी अजून फैसला झाला नाही. 
 कोल्हापूर उत्तरसाठी माजी नगरसेवक विजय साळोखे, शर्मिला शैलेश खरात यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. दोन दिवसात कोल्हापूर उत्तरसाठी ३५ जणांनी ६६ अर्ज नेले. तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात २८ जणांनी ७३ अर्ज नेले आहेत. कोल्हापूर उत्तरमधून दौलत देसाई इच्छुक आहेत. उमेदवारीसाठी त्यांनी नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते सक्रिय असतात. 
दरम्यान आतापर्यत जिल्ह्यातील विविध मतदारसंघात मिळून चार अर्ज दाखल आहेत. यामध्ये चंदगड मतदारसंघात शिवाजी शतुप्पा पाटील, संतोष आनंदा चौगुले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. कोल्हापूर दक्षिणमधून संजय भिकाजी मागाडे यांनी अर्ज भरला. हातकणंगलेतून गणेश विलास वायकर यांनी अर्ज भरला आहे.