+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसमरजितसिंह घाटगे गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार adjustशिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी, राधानगरीतून केपी, शाहूवाडीत सत्यजित पाटील adjustमुश्रीफ म्हणाले शक्तीपीठ महामार्ग रद्द ! सतेज पाटील म्हणतात सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक !! adjustडॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव adjust के. पी. पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश ! राधानगरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना !! adjustअमल महाडिक गुरुवारी अर्ज भरणार adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार !
1001157259
1001130166
1000995296
schedule23 Oct 24 person by visibility 35 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय पाटील  यांचा ९० वा वाढदिवस मंगळवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. 
शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दादासाहेबांनी मंगळवारी ९१ व्या वर्षात पदार्पण केले. यावेळी त्यांची ग्रंथतुला करण्यात आली. ही पुस्तके गरजवंत विद्यार्थ्यांना वितरीत केली जाणार आहेत. यावेळी  शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, डॉ. विजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, अजिंक्य डी. पाटील, सुप्रिया पाटील, डॉ. नंदिनी पालशेतकर, डॉ. प्रिया चोलेरा,  राजश्री काकडे, वैजयंती संजय पाटील,  शिवानी पाटील,  पूजा पाटील,  मेघराज काकडे, डॉ. रष्मित चोलेरा, डॉ.पालशेतकर, आमदार ऋतुराज पाटील,  पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील,  स्मिता योगेश जाधव, सोमनाथ पाटील, भरत पाटील, करण काकडे, चैत्राली काकडे, स्नेहल समीर मुळे यांच्यासह सुना, जावई, नातसुना-जावई, नातवंडे- पणतवंडे यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
   माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव कदम  यांनी फोनद्वारे जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील,  अजित पाटील बेनाडीकर, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे डॉ. डी. आर. मोरे, डॉ. व्ही. एम. पाटील, जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, रमा बोंद्रे, अभिषेक बोंद्रे, अण्णासाहेब चव्हाण पाटील, धैर्यशील पाटील, आलोक जत्राटकर आदी उपस्थित होते.