+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द - पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustडॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव adjust के. पी. पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश ! राधानगरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना !! adjustअमल महाडिक गुरुवारी अर्ज भरणार adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !!
1001157259
1001130166
1000995296
schedule23 Oct 24 person by visibility 36 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी भुदरगड मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. माजी आमदार आणि बिद्री कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश कला. मनगटावर शिवबंधन बांधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. 
  यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते. यावेळी के. पी. पाटील यांच्यासोबत गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगले, किसन भाटळे आदी उपस्थित होते. 
  दरम्यान के. पी. पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा पारंपरिक लढत रंगणार आहे. विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. आबिटकर यांच्या विरोधात निवडणूक लढवायची आणि जिंकायची या इराद्याने के. पी. पाटील हे गेले काही महिने तयारी करत आहेत.यापूर्वी २००४ व २००९ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. शिवाय काही महिन्यापूर्वी झालेल्या बिद्री कारखाना निवडणुकीत के. पी आणि आबिटकर हे आमनेसामने उभे ठाकले होते. त्या निवडणुकीत के. पी. पाटील यांनी बाजी मारली होती. 
 आबिटकर हे सलग दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. २०१४ व २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेच्या चिन्हावर जिंकले आहेत.  यंदा निवडणूक जिंकून हॅटिट्रक करायची या इराद्याने ते निवडणुकीत उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात काय होणार ? याकडे नजरा लागल्या आहेत.