+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसमरजितसिंह घाटगे गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार adjustशिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी, राधानगरीतून केपी, शाहूवाडीत सत्यजित पाटील adjustराजेश क्षीरसागरांनी घेतला अर्ज ! दौलत देसाई, मंजिरी मोरेंचाही समावेश !! adjustमुश्रीफ म्हणाले शक्तीपीठ महामार्ग रद्द ! सतेज पाटील म्हणतात सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक !! adjustडॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव adjust के. पी. पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश ! राधानगरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना !! adjustअमल महाडिक गुरुवारी अर्ज भरणार adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश
1001157259
1001130166
1000995296
schedule23 Oct 24 person by visibility 165 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे ६५ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. पक्षप्रमुख उद्ध्व ठाकरे यांनी उमेदवारांची यादी घोषित केली आहे. या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी-भुदरगड मतदारसंघात माजी आमदार के. पी. पाटील व शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांची उमेदवारी घोषित केली आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात आता जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार विनय कोरे आणि महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील अशी लढत होणार हे स्पष्ट झाले.
ठाकरे यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये विद्यमान आमदार, पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाणे येथील पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे, युवा सेनेचे वरुण देसाई यांना वांद्रे पूर्व, ठाणे येथून राजन विचारे, दिंडोशी सुनील प्रभू, विक्रोळीतून सुनल राऊत, ऐरोलीमधून एम. के. मढवी, गोरेगावमधून समीर देसाई, महाडमधून स्नेहल जगताप, बार्शीतून दिलीप सोपल, सांगोलामधून दिपक साळुंखे, गुहागरमधून भास्कर जाधव, दापोलीत संजय कदम, रत्नागिरीमध्ये सुरेंद्रनाथ माने, कुडाळमध्ये वैभव नाईक, सावंतवाडीत राजन तेली यांना उमेदवारी घोषित केली आहे.