प्रो कबड्डी पंच उजळणी शिबिर कोल्हापुरात, देशभरातील पंच सहभागी
schedule03 Oct 24 person by visibility 162 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खेळाच्या प्रचार आणि प्रसारात पंचांचं मोठं योगदान असतं असे उदगार शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. आर. बी. पाटील यांनी काढले.
येथील कबड्डी राव अकॅडमीमध्ये प्रो कबड्डीच्या पंच उजळणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते आर. बी. शेडगे हे उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. संभाजी पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ई प्रसाद राव यांची प्रमुख उपस्थिती होती. कबड्डी राव अकॅडमीच्या व्यायाम शाळेच्या हॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात संपूर्ण भारतातून कबड्डी लीगसाठी निवडलेले पंच सहभागी झाले आहेत
प्रो कबड्डी लीग अकरावे सत्र यावर्षी सुरू होत आहे. यामध्ये काम करणाऱ्या सामना अधिकाऱ्यांचे चर्चासत्र व उजळणी वर्ग घेतला जातो. कोल्हापूरमध्ये राव कबड्डी अकॅडमी मध्ये सलग तिसऱ्या वर्षी याचे आयोजन केले आहे.
यावेळी आर. बी. पाटील म्हणाले की कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कबड्डी प्रशिक्षण केंद्र उभारले आहे याचा मला अभिमान आहे. अशा केंद्रातूनच केवळ खेळाडू तयार न होता स्पर्धेसाठी लागणारे पंच व इतर अधिकारी सुद्धा तयार होतील.
यावेळी डॉ. रमेश भेंडीगिरी यांनी अकॅडमीबद्दल माहिती देताना हे पंच उजळणी शिबिर पंधरा दिवस चालेल असे सांगितले. कार्यक्रमासाठी जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब गावडे पंच मंडळाचे प्राचार्य डॉ. बाबासो उलपे, के. एस. माने शिवछत्र पुरस्कार विजेत्या उमा भोसले भेंडीगिरी, सौ ई प्रसाद राव भारतीय कबड्डी संघाच्या पंच मंडळाचे सदस्य विश्वास मोरे बेंगलोर साईचे माजीं डायरेक्टर नटराजन आदी उपस्थित होते. प्रा. चंद्रशेखर शहा यांनी सूत्रसंचालन केले.प्रा. आण्णासो गावडे यांनी आभार मानले.