खाजगी प्राथमिक शिक्षकांचा शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद
schedule31 Dec 24 person by visibility 1749 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुख्याध्यापकांच्या थांबविलेले अर्जित रजा रोखीकरण पुर्ववत सुरु करा, वैद्यकीय बिलांचे शंभर टक्के प्रतिपूर्ती द्या, सातव्या आयोगाच्या टप्प्यानुसार वेतनेतर अनुदान मंजूर करा अशा घोषणा महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत यासाठी या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन पुकारले होते. याप्रश्नी शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व शिक्षक संघटनांची तातडीची बैठक आयोजित करावी अशी मागणी केलीं.
महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, राज्य सल्लागार एम डी पाटील, विभागीय अध्यक्ष अशोक आरंडे, विभागीय सचिव राजाराम संकपाळ, जिल्हाध्यक्ष दस्तगीर मुजावर, सचिव नितीन पनारी जिल्हा उपाध्यक्ष फारुख सय्यद शहराध्यक्ष संतोष पाटील सचिव रवींद्र नाईक शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, जिल्हा व शहर कार्याध्यक्ष धीरज पारधी अभिजीत साळोखे राजू पांढरबळे , शहर शिक्षकेतर प्रमुख विद्या बारामते, महिला आघाडी प्रमुख मिनाज मुल्ला, अमित वळवी. सुभाष पाटील, संतोष केसरकर, संतोष कुंभार, सुनील मस्के, अर्जुन कांबळे आदींचा सहभाग होता.