Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

रंकाळा तलाव परिसरातील विद्युत दिव्यांची नासधूस करणाऱ्यांवर फौजदारी करा

schedule03 Jan 25 person by visibility 86 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसर सुशोभिकरण अंतर्गत बसविलेले आकर्षक विद्युत दिवे व खांबची नासधूस करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महापालिकेचे उपायुक्त साधना पाटील यांच्याकडे करण्यात आली.

    किशोर घाटगे, गजानन तोडकर, उदय भोसले आदींच्या शिष्टमंडळाने महापालिका उपायुक्तांशी चर्चा केली. याप्रसंगी त्यांनी, ‘ कोल्हापूर शहराचा रंकाळा तलाव हा मानबिंदू आहे. सुशोभिकरण कामामुळे रंकाळ्याचे सौंदर्य आणखी खुलले आहे. रंकाळा पाहण्यासाठी  पर्यटक रोज रंकाळयाला भेट देत आहेत. पण अलिकडे रंकाळ्यावर विद्युत दिवे व खांब यांची दुरवस्था करण्याचा प्रकार सुरू आहेत.

ही घटना घडूनही महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. परिसरातील सी. सी. टीव्हीची मदत घेऊन संबंधितांवर प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावा. रंकाळ्यावर विक्रीसाठी फेरीवाल्याकडून रंकाळा  घाण करण्याचे प्रकार घडत आहे. त्यांचेवर आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई व्हावी. तसेच रंकाळा सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. देवकर पाणंद येथून जे प्रदुषण होऊन रंकाळा दूषित होते, त्यावर त्वरीत उपाय योजना करावी.’अशी मागणी केली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes