डॉ. प्रविण कोडोलीकर यांना धम्म विचार साहित्य गौरव पुरस्कार
schedule04 Jan 25 person by visibility 92 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे संस्थापक डॉ. प्रविण कोडोलीकर यांना धम्म विचार साहित्य गौरव पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हा पुरस्कार दिला जातो. ट्रस्टतर्फे, पाच जानेवारी २०२५ रोजी सातवे धम्मविचार साहित्य व संस्कृती समेलन होत आहे. दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकाळी १०.३० वाजता संमेलनाला प्रारंभ होईल. या समेलनात पुरस्कार वितरण होईल.ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. करुणा विमल व निवड समिती अध्यक्ष प्रा. अमर कांबळे यांनी पुरस्कारांची घोषणा केली आहे. यापूर्वी डॉ. कोडोलीकर लिखित ‘राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र सेवा दल’या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा व करवीर साहित्य सभा या संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. डाॉ. कोडोलीकर हे कृती समितीच्या माध्यमातून शिव महोत्सवचे आयोजन करतात. पदवीधरांच्या प्रश्नांची सोडवणूक, सामाजिक कामात सहभाग असतो.