'कोल्हापूर बॅडमिंटन'चा तेरा जानेवारीला विशेष कार्यक्रम, प्रकाश पदुकोणची उपस्थिती
schedule03 Jan 25 person by visibility 234 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 13 जानेवारी 2025 विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू पद्मश्री प्रकाश पदुकोन व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे मानद सचिव श्रीकांत वाड उपस्थित राहणार आहेत अशी माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सतीश घाटगे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून पॅरालिंपिक ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते व पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांची उपस्थिती असणार आहे. रेसिडेन्सी क्लबचे दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी दहा वाजता बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक यांच्याशी संवादाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी साडेपाच वाजता आजी-माजी बॅडमिंटनपटू, असोसिएशनला सहकार्य करणाऱ्या व्यक्ती यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. प्रकाश पदुकोण व अन्य अतिथींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वेबसाईटचे अनावरण व विशेषांकाचे प्रकाशने करण्यात येणार आहे या विशेष अंकाच्या माध्यमातून बॅडमिंटनचा इतिहास उघडणार आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विनोद भोसले, तन्मय करमरकर, सुमित चौगुले, चंद्रशेखर सोवनी, साईदास खणगाव, अरुण रसाळ, देविका घाटगे, वर्षा नाडगौडे आदी उपस्थित होते.