Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

बारावाडी प्रीमियर अंतर्गत आबाजी चषक जिंकला जय वॉरियर्स आमशी संघाने

schedule03 Jan 25 person by visibility 410 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : बारावाडी प्रीमिअर लीग पर्व दोन अंतर्गत आयोजित आबाजी चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद जय वॉरियर्स आमशी या संघाने जिंकले. विठ्ठलाई स्पोर्टस विठ्ठलाईवाडी संघाला उपविजेतेपद मिळाले.

या स्पर्धेतील  तृतीय क्रमांक- विशाल भाऊ स्पोर्ट्स बोलोली व चतुर्थ क्रमांक- स्वयंभूराज स्पोर्ट्स स्वयंभूवाडी संघाला मिळाला. स्पर्धेतील मालिकावीरचा मानकरी नामदेव मंडलिक (विठ्ठलाई स्पोर्ट्स विठ्ठलाईवाडी) ठरला. बेस्ट बॅट्समन- नामदेव मंडलिक (विठ्ठलाई स्पोर्ट्स विठ्ठलाईवाडी), बेस्ट बॉलर- अनुज पाटील (जय वॉरियर्स आमशी) ठरला.

रयत संघाचे चेअरमन सचिन पाटील, सुनील पाटील, दिगंबर बाटे, संभाजी लहू बाटे, संतराम राणे, शशिकांत बाटे, यशवंत पाटील, बाळासो आरडे, अनिल बाटे, संभाजी मारुती दुर्गुळे, संभाजी विष्णू दुर्गुळे, जयदीप पाटील, संजय चौगुले आदींच्या उपस्थितीमध्ये झाला. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आयोजक कमिटीतीलसुनील पाटील, महादेव मंडलिक, संदीप बाटे, विश्वास पाटील, ज्ञानदेव कांबळे, पवन पाटील, सुदाम बाटे, ज्ञानदेव पाटील, कृष्णात पाटील, सुरेश बाटे, प्रदिप गुंडप, सतिश बाटे यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes