डॉ. मंजिरी मोरे-देसाई यांना ‘आधुनिक सावित्री पुरस्कार’ ! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राची घोषणा !!
schedule03 Jan 25 person by visibility 496 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र संचलित करिअर कट्टा उपक्रमांतर्गत राज्यभरातील कर्तृत्ववान महिलांना ‘आधुनिक सावित्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी अजित मोरे –देसाई यांना ‘आधुनिक सावित्री पुरस्कार-२०२५’ जाहीर झाला आहे. डॉ. मोरे यांच्यासह राज्यभरातील सतरा महिलांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी पुरस्कारांची घोषणा कली आहे.
डॉ. मंजिरी मोरे या कोल्हापुरातील नामांकित गोपाल कृष्ण गोखले कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. संशोधन क्षेत्रातही त्या अग्रेसर आहेत. त्यांच्या पुढाकारातून देशातील आणि परदेशातील मोठया शैक्षणिक संस्थेसोबत गोखले कॉलेजचा सामज्यंस करार झाला आहे. त्यांनी पुढाकार घेत आंतरराष्ट्रीय परिषद गोखले कॉलेजमध्ये यशस्वीरित्या भरविल्या आहेत. विविध संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या त्या चेअरमन आहेत. शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणून काम करताना उच्च शिक्षणाशी निगडीत प्रश्नांची सोडवणूक, कॉलेजिअसच्या विकासाला गती देणारे धोरण मांडत अभ्यासू सदस्य म्हणून छाप उमटविली आहे. अॅकेडमिक कौन्सिलवर काम करतात.
शिक्षण प्रसारक मंडळात पहिल्यांदा प्रशासनाधिकारी व आता चेअरमन म्हणून काम करताना विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, कॉलेज कॅम्पसमध्ये प्लेसमेंट सेल, बदलत्या काळाची गरज ओळखून संस्थेत व्यावसायिक कोर्सेस यावर भर दिला आहे. श्रीमती सुशिलादेवी म देसाई युवती सचेतना फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करताना त्यांनी विद्यार्थिनींचे करिअर, व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवितात. त्यांच्या शैक्षणिक, संशोधन व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा, ‘‘आधुनिक सावित्री पुरस्कार-२०२५’’ जाहीर झाला आहे.
‘शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई यांचे मार्गदर्शन, संस्थेचे पेट्रन कौन्लिस मेंबर दौलत देसाई व पती माजी नगरसेवक अजित मोरे यांची साथ, कॉलेजमधील प्राध्यापक-कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामुळे मी विविध क्षेत्रात सक्षमपणे काम करू शकते,. हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. ’अशा भावना डॉ. मंजिरी मोरे यांनी व्यक्त केल्या.