राशिवडेत प्रकाश आबिटकरांची विराट सभा, विजयाचा केला निर्धार
schedule18 Nov 24 person by visibility 45 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
राधानगरी मतदारसंघाचा विकास व्हावा या एकाच ध्येयापोटी आमदार प्रकाश आबीटकर यांनी भगवा पताका खांद्यावर घेतली असुन त्यांनी आपल्या साठी कधी ही काहीही मागितले जे काही मागितले ते केवळ या मतदारसंघाच्या विकासासाठी मागितले त्यांचे एवढे कर्तृत्व आहे की महाराष्ट्राला गवसणी घालण्याची ताकत त्यांच्या मध्ये आहे असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे प्रचार सभा आयोजित केली होती. या सभेत ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब नवणे, राधानगरी तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, आरपीआय चे प्रदेशाध्यक्ष शहाजी कांबळे,जालिंदर पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले ,वाड्या वस्त्या वर विकास नेला आहे. चांगल्या पद्धतीचे काम या परिसरात झाली आहेत . दहा वर्षांपूर्वीची बाजार पेठ आठवा काय अवस्था होती आणि आताची बाजार पेठेचे रूप पहा. राशिवडेतील विकास पाहुन जनता सुखावली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले की,कुठलाही गट तट पक्ष न मानता आबीटकर यांनी मतदारसंघात कामे केल्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून प्रकाशराव यामुळे विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे
प्रा जालिंदर पाटील म्हणाले राशिवडे मध्ये प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम आंबेडकर यांनी केले असून प्रचंड निधीमुळे राशीवड्याची रूपडे पालटले आहे. गोकुळ चे चेअरमन अरुणकुमार डोंगळे म्हणाले की,के पी पाटील दहा वर्षांत मतदार संघात काय विकास केला यांचे आत्मचिंतन करावे तुम्हाला संधी मिळाली पण तिचे सोने करता आली नाही के पी चे पुस्तक कोरे आहे.आबीटकरांनी मतदार संघात प्रचंड काम केले आहे.त्यांना एवढे मताधिक्य द्या . आर पी आय चे प्रदेशाध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे म्हणाले,राशिवडेतील प्रचंड गर्दी विजय निश्चित करणारी आहे .
यावेळी रविश पाटील -कौलकर, संभाजीराव आरडे, विजय महाडिक, शेखर पाटील, धीरज कळस्कर,शाकीर पाटील,पवन महाडीक, दिलीप पाटील, रावसाहेब डोंगळे, अजित पाटील, प्रल्हाद पाटील, सरपंच संजीवनी पाटील, हरीश मगदूम, सुनिल तवटे, राम चौगले, मुराद मुल्ला, मच्छिंद्र लाड, आनंदा चौगले, अशोक पाटील, मंदाकिनी पाटील, साधना पाटील उपस्थित होते.