Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
छछ डडस्मॅकच्या वार्षिक सभेत यतीन शाहांच्या मुलाखतीतून गवसली उद्योग - व्यवसायाची यशस्वितेची सूत्रे, सहा युवा उद्योजकांचा गौरवकेएमएतर्फे दोन दिवसीय वैद्यकीय परिषद, डॉ. विवेकानंद कुलकर्णींना जीवन गौरव पुरस्कारऑडिओ क्लिपमधील चर्चा करणारे भाजपशी संबधित, भाजपने स्पष्टीकरण द्यावे - मंत्री उदय सामंत शिक्षक-शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी  प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करा : मालोजीराजे छत्रपती सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, १५६ जणांवर कारवाईप्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध- कौस्तुभ गावडेशिवसेनेचे उमेदवार सचिन सानप यांच्याकडून शिक्षक मतदारांना लक्ष्मीदर्शन - आमदार सतेज पाटलांचा आरोपशिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रफुल्ल तावरेंचा प्रा.जयंत आसगावकरांना पाठिंबाकेडीसीसी बँकेसाठी आता काय करायला पाहिजे हे मुश्रीफांनी ठरवावे- सतेज पाटलांचा मर्मभेदी टोला

जाहिरात

 

स्मॅकच्या वार्षिक सभेत यतीन शाहांच्या मुलाखतीतून गवसली उद्योग - व्यवसायाची यशस्वितेची सूत्रे, सहा युवा उद्योजकांचा गौरव

schedule22 Oct 26 person by visibility 33 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :‘ उद्योगात यश मिळविण्यासाठी मोठे ध्येय, जोखीम घेण्याची तयारी, जिद्द आणि आर्थिक शिस्त आवश्यक आहे. मोठं ध्येय ठेवलं नाही, तर तुम्ही मोठी कामगिरी करू शकत नाही. मोठ्या आव्हानाला कधीही नाही म्हणू नका. निदान, ते घडण्यापूर्वी आपलं सर्वोत्तम द्या…’अशा शब्दांत प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड, सोलापूरचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक यतीन सुभाष शाह यांनी उद्योग –व्यवसायातील यशस्वितेची सूत्रे उलगडली.

निमित्त होतं, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या स्मॅक ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे. यानिमित्त  यतीन शहा यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले हाते.  अध्यक्षस्थानी स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले होते.  हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉलमध्ये ही सभा झाली. याप्रसंगी शिरोली औद्योगिक क्षेत्रातील सहा युवा उद्योजकांना ‘युवा उद्योगरत्न’ सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये श्रीमती स्मिता योगेश घोरपडे (भाग्यश्री एंटरप्रायझेस), साक्षी विजय जाधव (विश्वकर्मा फाउंडर्स इंडिया प्रा. लि.), किरित बिडकर (प्रिसाइज कॉम्पोनंट्स), प्रतीक संजय दुधाळ (क्वालिटी टूल्स अँड इक्विपमेंट्स), पार्थ राजुल लायनेसवाला (राजुर्वी इंजिनिअर्स) आणि आदर्श नामदेव जाधव (रमाई इंजिनिअर्स) यांचा समावेश आहे. स्वप्नील पन्हाळकर यांनी शाह यांची मुलाखत घेतली.

 मुलाखती दरम्यान कोल्हापूरच्या उद्योजकांमधील एकजुटीचे कौतुक करताना ‘तुमच्यातलं स्पिरिट मला फार कमी वेळा भेटतं. तुम्ही खूप पुढे गेले आहात.’असे शाह यांनी सांगितले. तरुण पिढीला मार्गदर्शन करताना शाह यांनी ‘जेन-झीसाठी चार-पाच वर्षांची खिडकी असते. वयाच्या ३१-३२ पर्यंत स्थिर झाला नाहीत, तर हरवलात. स्थैर्य लवकर यावं लागतं.उद्योजकांनी मोठी आव्हाने स्वीकारावीत, सतत शिकत राहावे आणि समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजाला योगदान द्यावे,’असे आवाहन केले.

पहिल्या सत्रात स्मॅकची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्ष जयदीप चौगले स्वागत व प्रास्ताविक केले. अहवाल वाचन स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष प्रशांत शेळके, स्मॅक क्लस्टरचे चेअरमन सुरेश चौगुले, स्मॅक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे चेअरमन आय. ए. पाटील यांनी केले. सभेचे प्रोसिडिंग वाचन मॅनेजर यांनी केले. उपाध्यक्ष भरत जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.ऑनररी सेक्रेटरी रणजीत जाधव यांनी आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि भारतीय टपाल विभागाने त्यांच्या छायाचित्रासह जारी केलेल्या टपाल तिकिटाची फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी स्मॅकचे संचालक सुरेंद्र जैन, राजू पाटील, अतुल पाटील, नीरज झंवर, शेखर कुसाळे, स्वीकृत संचालक एम. वाय. पाटील, भीमराव खाडे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, गोशिमाचे अध्यक्ष संजय देशिंगे, उपाध्यक्ष अमोल जाधव, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, उद्यम सोसायटीचे अध्यक्ष अशोक जाधव, सीआयआयचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, स्मॅकचे माजी अध्यक्ष आर. बी. थोरात, डी. एस. लडगे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक, उद्योजक सचिन शिरगावकर, दीपक जाधव, प्रताप पुराणिक, अमोल पाटील, रामराजे बदाले, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे शिवराज नाईकवाडी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes