+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule26 Sep 24 person by visibility 106 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. संस्थेचे पेट्रन इन चीफ खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार झाला. शाहू स्टेडियम येथे हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी संस्थेतर्फे खासदारपदी निवडून आल्याबद्दल शाहू महाराज यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक विजेता नेमबाजपटू स्वप्निल कुसाळे, केडीसीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल युवराज संभाजीराजे, विफाच्या उपाध्यक्षपदी पाचव्यांदा निवड झाल्याबद्दल युवराज मालोजीराजे आणि विश्व नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल राजकुंवर इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या फुटबॉल, लॉन टेनिस, क्रिकेट, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक खेळातील खेळाडूंच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल सत्कार झाला.
संस्थेचे मानद सरचिटणीस माणिक मंडलिक यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मधुरिमाराजे छत्रपती, नंदकुमार बामणे, प्रा. अमर सासने, राजेंद्र दळवी, संभाजी पाटील-मांगोरे, विश्वास मालेकर, नितीन जाधव, प्रदीप साळोखे, संजय पोरे, मनोज जाधव, भाऊ घोडके आदी उपस्थित होते.