लाटकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदार करण्याचे जनतेचं ठरलयं – दौलत देसाई
schedule18 Nov 24 person by visibility 47 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माझ्यासह कित्येक दिग्गज आमदारकीचे तिकीट मागत होते. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. मात्र सतेज पाटील यांनी एका सामान्य उमेदवाराला उमेदवारी देऊन इतिहास घडवला आहे. लाटकर यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आमदार करण्याचे जनतेचं ठरवले असून लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे असे दौलत देसाई म्हणाले.
न्यू शाहूपुरी येथे लाटकर यांच्यासाठी महाविकास आघाडीची कोपरा सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, मंजित माने, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, हर्षल सुर्वे हे प्रमुख उपस्थित होते.
उमेदवार राजेश लाटकर म्हणाले, खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्यातच यांची १५ वर्षे गेली. त्यातच गेल्या चार वर्षांपासून राज्यभर महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद या ठिकाणी लोकनियुक्त प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया राबविली गेली नाही. त्यामुळे प्रशासकाच्या नावाखाली यांनी राज्याच्या तिजोरीची लुटच लुट केली. या लुटीचा एक हिस्सा घेतलेले विरोधी उमेदवाराची भूक कधी भागतच नाही. त्यासाठी डॉक्टर, अधिकाऱी, कॉन्ट्रॅकटरना धमकी देणे, शेजारी, बिल्डरला मारहाण करण्यात यांनी धन्यता मानली. कोणी किती काम केले, याचा लेखाजोखा मांडायचा असेल तर त्यांना माझे तुमच्यासमोर आव्हान आहे. त्यांनी कधीही, कुठेही व्यासपीठावर चर्चेसाठी बोलवावे.
यावेळी उत्तम पाटील, भय्या शेटके, वासीम जमादार, यासीम जमादार, प्रमोद अतिग्रे, दिलीप शिर्के, संजय घाडगे, मीरासाहेब जमादार यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते