पीएन यांच्यावर प्रेम करणारी मंडळी राहुल पाटील यांच्या पाठीशी -गोकुळचे संचालक विश्वास पाटील
schedule09 Nov 24 person by visibility 203 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
आतापर्यंत मी अनेक विधानसभा निवडणुका बघितल्या, मात्र यावेळी राहुल पाटील यांच्या विजयाचा सर्वांनीच चंग बांधल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्यावर प्रेम करणारे हजारो ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांचा आशीर्वाद राहुल पाटील यांना आहेच शिवाय राहुल पाटील यांच्याविषयी युवकांमध्ये मोठी क्रेझ आहे. प्रचंड उत्साहाने युवक प्रचारात सक्रिय आहेत. त्यामुळे राहुल पाटील याना या परिसरातून एवढे मोठे मताधिक्य मिळणार की, ते लीड कुठेच तुटणार नाही, असे प्रतिपादन गोकुळचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले.
सांगरूळ व सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. उमेदवार राहुल पी.पाटील म्हणाले, जुन्या सांगरुळ विधानसभा मतदारसंघाने प्रत्येक निवडणुकीत पी.एन. पाटील यांना भरभरून मताधिक्य दिले आहे. आपल्या सर्वांच्या साथीने हा स्नेहबंध असाच घट्ट ठेवायचा आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी, जनतेच्या कामासाठी, विकासासाठी आपले आयुष्य पणाला लावले, याचे साक्षीदार आपण आहात. मोठ्या फरकाने या निवडणुकीत विजयी करा. यावेळी अमर पाटील शिंगणापूरकर, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, यशवंत बँकेचे संचालक नंदकुमार पाटील, डी. के. पाटील, माजी जि.प.सदस्य सुभाष पाटील, शिरोली दुमाला सरपंच सचिन पाटील, चेतन पाटील, बुद्धीराज पाटील, माजी उपसभापती विजय भोसले यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते. गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील यांनी आभार मानले.
..अन कार्यकर्त्याला जीवदान मिळाले :
धोंडेवाडी येथील अर्जुन नलवडे यांना रात्रीच्यावेळी साप चावला, तोंडाला फेस येत होता. रात्री बारा वाजले असताना काही मंडळी थेट पी एन यांच्या घरी गेले. त्यांना घटना सांगताच त्यांनी क्षणात सीपीआर मधील डॉक्टरना फोन लावून मी दवाखान्यात येतोय,उपचार सुरू करा असे सांगितले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पी एन पाटील दवाखान्यात पोहोचले. उपचार करून बाहेर येताच डॉक्टरनी, ज्या तळमळीने आपण फोन केला, स्वतः आलात त्यामुळेच आम्ही रात्री सुट्टीवर असताना हे काम केले. जरा देखील उशीर झाला असता तर वाईट घडले असते असे सांगितले. पी एन यांच्यामुळे कार्यकर्त्याला जीवदान मिळाल्याचा दाखला गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे यांनी दिला.