अभ्यासक्रमातील महिलांविषयक दृष्टीकोन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा
schedule31 Dec 24 person by visibility 47 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रातर्फे अधिविभागातील महिला प्राध्यापक आणि अधिकारी यांच्यासाठी ‘अभ्यासक्रमातील महिलांविषयक दृष्टीकोन’या विषयावर ३ जानेवारी २०२५ रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.हा कार्यक्रम स्त्री अभ्यास केंद्राच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता होणार आहे.
कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. याप्रसंगी उल्लेखनीय योगदान आणि कार्यासाठी महिला प्राध्यापकांचा सत्कार, तसेच केंद्राच्या वतीने ‘संवादसेतू’ या व्यासपीठाचे उद्घाटनदेखील करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी डॉ. सुहासिनी पाटील (वित्त व लेखा अधिकारी), प्राचार्य डॉ.मेघा गुळवणी (अधिष्ठाता, आंतरशाखीय विद्याशाखा), प्रा.(डॉ.)सरिता ठकार (अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान), अॅड. अनुष्का कदम, (कायदा अधिकारी), डॉ. विनिता रानडे (वैद्यकीय अधिकारी), प्रा.(डॉ.) भारती पाटील (समन्वयक, शारदाबाई पवार अध्यासन), प्रा. (डॉ.) वर्षा जाधव (मा.अध्यक्ष, अंतर्गत तक्रार निवारण समिती), डॉ.प्रतिभा देसाई (समन्वयक, बेटी बचाओ अभियान) यांची उपस्थिती असेल. या कार्यशाळेचा लाभ महिला प्राध्यापक, अधिकारी यांनी घ्यावा, असे आवाहन स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा.(डॉ.) निशा मुडे-पवार यांनी केले आहे