कोल्हापूर थिंक टँकच्या माध्यमातून नव्या संकल्पना राबवणार -आमदार ऋतुराज पाटील
schedule18 Nov 24 person by visibility 41 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणला नवा चेहरा देण्यासाठी दक्षिण व्हिजन 2.0 च्या माध्यमातून नवसंकल्पना राबवणार आहे. कोल्हापूर शहराच्या सर्वाधीक वेगाने वाढणा-या उपनगरांचा सुनियोजित विकास करण्यावरसुध्दा माझा भर असेल. अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.
साने गुरुजी वसाहत येथे आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, सुरज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील तज्ञ, युवा पिढी यांना सोबत घेऊन कोल्हापूर थिंक टँकची यासाठी मदत घेणार आहे. यासाठी युवा पिढीने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे. इंडस्ट्री एरियासाठी आवश्यक फॅसिलिटी, आयटी कंपन्यांसाठी फॅसिलिटी तसेच नवीन आयटी कंपन्यांना एमआयडीसीच्या दरामध्ये शेंडा पार्क परिसरात जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
मिशन रोजगार संकल्पनेची व्याप्ती वाढवून युवा पिढीला जॉब मिळवून देण्यावर विशेष भर देऊ. मोबाईल फोनपासून मुक्त असणाऱ्या पब्लिक रिडींग स्पेसेस निर्माण करणार असून जनतेच्या सोयीसाठी चालते फिरते ‘जनहित केंद्र’ सुरु करणार आहे. आहे पाटील यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, स्मार्ट स्कूल व आरोग्य सुविधा, सार्वजनिक सुरक्षा, करिअर लाइट हाऊस अशा विविध संकल्पना यामध्ये समाविष्ठ आहेत.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ अधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी मी आखलेल्या विविध योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या सर्वांचे भक्कम पाठबळ मिळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी किरण पाटील, दिग्वीजय मगदूम, मयूर पाटील, इजाज नागरगट्टी उपस्थित होत्या.