Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शाळेच्या पहिल्याच दिवशी तीन लाख विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके ! जिल्ह्यात १७ लाखहून अधिक  पाठ्यपुस्तकांचे वितरण !!शुभेच्छासाठी नकोत हार-बुके-शाल-फेटा ! जमा करा सैनिक कल्याण निधीसाठी रक्कम !!गोकुळमध्ये सत्ताधारी आघाडीत बिघाडी ? अरुण डोंगळे बंडखोरीच्या पावित्र्यात, चेअरमनपदाचा राजीनामा नाही !!शारंग चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, वेताळमाळ तालीम मंडळाची विजयी सलामीडीवाय पाटील विद्यानिकेतनचा दहावी सीबीएसईचा निकाल शंभर टक्केकेआयटीच्या माजी विद्यार्थी संघाचा अनोखा मैत्रभाव ! हयात नसलेल्या वर्गमित्रांच्या नावांनी अॅवार्डची घोषणा !!दहावी - बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक क्षमता चाचणीचे आयोजनहसन मुश्रीफांच्या उपस्थितीत शनिवारी शहर राष्ट्रवादीचा कोल्हापुरात मेळावा कोरगावकर हायस्कूलच्या सुहानाचे दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांची फेरनिवड ! कोल्हापूर महानगर वेटिंगवर !!

जाहिरात

 

शाळेच्या पहिल्याच दिवशी तीन लाख विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके ! जिल्ह्यात १७ लाखहून अधिक  पाठ्यपुस्तकांचे वितरण !!

schedule14 May 25 person by visibility 31 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जून २०२५ पासून सुरू होणाऱ्या यंदाच्या शैक्षणिक वर्षात  कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यात मिळून तीन लाख ३३ हजार २१६ विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तक वितरणाचा लाभ होणार आहे. एकूण १७ लाख दहा हजार २७२ पाठयुस्तक वितरण करण्यात येणार आहेत इयता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना मोफत पाठयपुस्तके देण्यात येतात. बालभारतीकडून सध्या या पुस्तकांचे तालुकानिहाय वितरण सुरू आहे.

सरकारी, स्थनिक सवराज्य संस्था तसच्ज खासगी अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके देण्यात येतात. बालभारतीकडून या पुस्तकांचे वितरण होते. बालभारतीकडून कोल्हापूर जिल्हयासाठी या पुस्तकांच्या वितरणला प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बालभारती भांडार व्यवस्थापक रवींद्र पवार, अधीक्षक सचिन जाधव, मनिष निघोट, समग्र शिक्षााचे सहायक कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करवीर,हातकणंगले तालुक्यासाठी पाठयपुस्तक वाहतुकीची सुरुवात झाली. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विषयतजज्ज्ञ आबाजी कांबळे, संतोष देसाई, संतोष ढवळे, उपस्थित होते. शाळेच्या पहिल्या दिनी सोळा जून २०२५ रोजी पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. बालभारतीकडून बुधवारी, १४ मे पासून या पाठयपुस्तकांचे तालुकानिहाय वितरण सुरू झाले आहे.

 तालुकानिहाय पाठयपुस्तक वितरण.

यामध्ये आजरा तालुक्यात ९९३० लाभार्थी विद्यार्थ्याना  ४७ हजार ९६६ पुस्तके, भुदरगड तालुक्यात१४ हजार ६४४ विद्यार्थ्यांना  ७१ हजार ४३१ पाठयुपस्तके, चंदग्ड तालुक्यातील  १८ हजार २०२ विद्यार्थ्यांना ९६ हजार ५४१ पाठयपुस्तके, गडहिंग्लज तालुक्यात २० हजार ४५२ लाभार्थ्यांना एक लाख ९ हजार ७९, गगनबावडा तालुक्यात ४४६३ विद्यार्थ्यांना  २३ हजार ६५, हातकणंगले तालुक्यात ७९ हजार ७३० विद्यार्थ्यांना चाल लाख ३८ हजार ६१२, कागलमध्ये  २९ हजार ११८ लाभार्थ्यांना एक लाख ५३ हजार ३९ पाठयपुस्तके, करवीर तालुक्यातील  ४३ हजार ६९४ विद्यार्थ्यांना दोन लाख ३३ हजार २०१ पाठयपुस्तके, पन्हाळा तालुक्यात ४६५८३ लाभार्थी विद्यार्थ्यांना एक लाख ४० हजार ९१३ पाठयपुस्तके, राधानगरी तालुक्यातील २७ ०१३ विद्यार्थ्यांना एक लाख चार हजार ८६९ पाठयपुस्तके, शाहूवाडी तालुक्यातील २०४५२ विद्यार्थ्यांना ९१ हजार २१ पाठयपुस्तके तर शिरोळ तालुक्यातील १८ हजार ६६५ विद्यार्थ्यांना दोन लाख ५३५ पाठयपुस्तकांचे वाटप होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes