हसन मुश्रीफांच्या उपस्थितीत शनिवारी शहर राष्ट्रवादीचा कोल्हापुरात मेळावा
schedule13 May 25 person by visibility 79 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा शनिवारी 17 मे 2025 रोजी होणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा आयोजित केला आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी दिली. या मेळाव्याची तयारी करण्यासाठी मंगळवारी, तेरा एप्रिल रोजी बालाजी हॉटेलमध्ये बैठक झाली. यावेळी बोलताना शहराध्यक्ष आदिल फरास यांनी मेळाव्याचे उद्देश सांगितला. निवडणूक पॅनेल पद्धतीने होणार याचे खुलासे वर माहिती दिली. येत्या शनिवारी मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात मेळावा घेण्यात येईल.
इच्छुकांनी आपल्या भागातील लोकांशी संपर्क वाढवावा. भागातील निरनिराळे कामे करावी त्यासाठी लागणारी सर्व मदत पक्षाच्या वतीने करण्यात येईल असा शहराध्यक्ष या नात्याने शब्द देतो", असे सांगितले . यावेळी माजी नगरसेवक संभाजी देवणे, उत्तम कोराणे, सुहास साळोखे, शितल तिवडे, रेखा आवळे, युवराज साळोखे, प्रमोद पोवार, जहिदा मुजावर, अच्युतराव साळोखे, यांनी मनोगत व्यक्त केले. पूजा साळुंखे यांनी आभार मांनले.
या सभेला माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, प्रकाश काटे, आनंदराव खेडकर, विश्वास आयरेकर, नंदकुमार गुजर, परीक्षित पन्हाळकर, संदीप कवाळे, महेश सावंत, सुनील पाटील, सतीश लोळगे, प्रकाश कुंभार, महेंद्र चव्हाण, सत्तार मुल्ला, सचिन लोहार, बजरंग देवकर, दिलीप टोणपे , बी के भास्कर, अलीम बारगीर, जहांगीर अत्तार, ओंकार माने, पप्पू पांढरे, निरंजन पवार, अमृत सुतार, योगेश पाटील, सुनील गाताडे, रेहाना नागरकटी, शाईन महात, स्वाती काळे, अलका वाघेला, सोनाली कांबळे, लक्ष्मी मांडेकर, सुप्रिया साळी, रफिक शेख, संदीप साळुंखे शाहरुख बागवान उपस्थित होते.