कोल्हापुरात रविवारी नवकार खुल्या बुद्धिबळ स्पर्धा
schedule07 Jan 25 person by visibility 29 categoryराजकीयक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय बुद्धिबळ खेळाचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा या हेतूने श्री मुनिसुव्रत स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे नवकार चेस फाउंडेशनमार्फत चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी, बारा जानेवारी २०२५ रोजी कोल्हापूर येथे स्पर्धा होणार आहेत.
एक दिवसीय होणाऱ्या या जलद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलाल संघवी , नवकार फाउंडेशनचे अध्यक्ष रवी आंबेकर तसेच चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगुले यांनी एका पत्रकाद्वारे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार खुल्या गटात खेळवल्या जाणार आहेत. यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो . स्पर्धा सर्वांसाठी खुली असून कोणीही या स्पर्धेत थेट सहभागी होऊ शकतो. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी रवि आंबेकर 90 49 211 894 व रिंकू गुंंदेशा 98 22 999 121 या नंबर वर संपर्क साधावा व अधिक माहिती घ्यावी , असे आवाहन स्पर्धा संयोजक यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीसे दिली जाणार आहेत.