समाजोपयोगी कार्यात महापालिका नेहमीच रोटरी सोबत : के. मंजूलक्ष्मी
schedule15 Oct 24 person by visibility 134 categoryआरोग्य
अत्याधुनिकीकरण केलेल्या दंतचिकित्सा विभागाचे हस्तांतरण
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिकरण केलेला सावित्रीबाई फुले रुग्णालयातील दंतचिकित्सा विभाग आता उत्तम प्रकारे सेवा देईल. अशा महत्वाच्या आणि समाजोपयोगी कार्यात महापालिका प्रशासन नेहमीच रोटरीच्या बरोबर असू, असे मत महापलिका आयुक्त के. मंजु लक्ष्मी यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन आणि कोल्हापूर रोटरी मोमेंट 2020-21 यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले रुग्णालया मध्ये रोटरी च्या समाजोपयोगी प्रकल्पांतर्गत सात लाख 50 हजार खर्चून अत्याधुनिकरण केलेल्या दंतचिकित्सा विभागाचा हस्तांतरण सोहळा रोटरीचे माजी प्रांतपाल संग्राम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी के. मंजूलक्ष्मी बोलत होत्या.
याप्रसंगी संग्राम पाटील यांनी रोटरीच्या आतापर्यंतच्या सर्व कार्याचा आढावा घेतला. यावळी रोटरी मिडटाउनचे सेक्रेटरी बी.एस. शिंपुकडे, लोक कल्याण मंडळाच्या अध्यक्षा उत्कर्षा पाटील, प्रकल्प अध्यक्ष डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. विकास पाटील, शिवाजी भोसले, सचिन लाड, श्रीकांत झेंडे, अकेत शहा, अनिकेत अष्टेकर, रितु वायचळ, अजित ठाणेकर, शरद पाटील, रोटरी मोमेंटचे अध्यक्ष बाबा जांभळे, आदी उपस्थित होते.