रा. कृ. कणबरकरांच्या आठवणी पुस्तकरुपात ! ३० सप्टेंबरपर्यंत लेख पाठविण्याचे आवाहन !!
schedule04 Aug 25 person by visibility 12 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: शिवाची विद्यापीठाचे माजी कुलगुरू रा. कृ. कणबरकर हे शिक्षण क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांच्या जीवनात त्यांचा अनेक विद्यार्थी, प्राध्यापक,आणि समाजातील अनेक मान्यवरांशी संबंध येऊन गेला आणि आठवणींच्या रूपाने त्यांच्याकडे तो ठेवा आहे.यातून त्यांना काही अनुभव आले असतील.सर्व ज्ञान अनुभवजन्य असते. या दृष्टीने त्यांच्या आठवणींचे "प्राचार्य कणबरकर आठवणी आणि अनुभव" ग्रंथ रूपाने प्रसिद्ध करावयाचे ठरविले आहे. त्यांच्या बरोबर काम केलेल्या त्यांच्या संपर्कातील सहकारी ,तसेच त्यांनी ज्या ज्या महाविद्यालयात व विद्यापीठात काम केले तेथील विद्यार्थी यांचेकडून आठवणींच्या स्वरूपात लेख, साहित्य मागविण्यात येत आहेत.
लेख लिहिताना प्राचार्य कणबरकर यांचा कोणता गुण किंवा पैलू आपणास विशेष करून भावला याचा उल्लेख करणे अपेक्षित आहे. अशाप्रकारे संकलीत झालेल्या लेखांचे संपादन व संकलन करण्यासाठी प्राचार्य कणबरकर साहेंबांच्या विचाराने प्रेरित असणारे प्रा .डॉ भालबा विभूते, प्रा.डॉ डी यू पवार , प्रा.डॉ रमेश जाधव , प्रा डॉ बी एम हिर्डेकर , प्रा.डॉ टी एस पाटील, प्रा डॉ दिनकर पाटील व डॉ नमिता खोत ( प्राचार्य कणबरकर सरांची कन्या ) यांची समिती आहे. तरी संबंधितांनी आपले लेख सॉफ्ट कॉपी( word file ) किंवा हार्डकॉपी 30 सप्टेंबर २०२५ पर्यंत आपल्या नाव ,पत्ता ,मोबाईल नंबर व ईमेल सहीत पाठवून द्यावी, साहित्य , लेखासाठी कोणतीही शब्द मर्यादा नाही. पत्ता:डॉ नमिता बाबासाहेब खोत वक्रतुंड, प्लॉट नं २१ , आर के नगर सोसा नं ४ मोरेवाडी, कोल्हापूर-४१६०१३ मो .नं ९८९००७०४०४(whats up) Email - namitalibrarian@gmail.com .