Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत प्रवेशिका उपलब्धमाजी नगरसेवक निलेश देसाईंचा मंगळवारी मुंबईत भाजपा प्रवेशकोल्हापुरात बुधवारी संघ गंगा के तीन भगीरथ नाटकाचा प्रयोग, आरएसएसची वाटचाल उलगडणार पाचा फबदेवराज बोटिंगचे अमर जाधव यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कारमहादेवीसाठी सुरु असलेल्या लढ्याला कोल्हापूरच्या मुस्लिम समाजाचा  पाठिंबा सर्किट बेंच मंजुरीबद्दल शिवसेनेकडून साखरपेढे वाटून आनंदोत्सव ! कोल्हापूरच्या विकासात मोलाची भर –राजेश क्षीरसागर सर्किट बेंचच्या निर्णयाबद्दल भाजपाचा आनंदोत्सव !सत्ताधाऱ्यांची आश्वासने नकोत, महादेवी हत्तीण किती दिवसात परत येणार ते सांगा-सतेज पाटीलहॉटेल मालक संघातर्फे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन

जाहिरात

 

माजी नगरसेवक निलेश देसाईंचा मंगळवारी मुंबईत भाजपा प्रवेश

schedule04 Aug 25 person by visibility 159 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : माजी नगरसेवक निलेश देसाई हे मंगळवारी 5 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आगामी महापालिका निवडणुकीसाठी  ताकतवान उमेदवार पक्षात सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापूर्वी मुंबई येथे माजी नगरसेवकांच्या पक्षप्रदेशाचा कार्यक्रम झाला होता. माजी नगरसेवक निलेश देसाई यांनी दोनदा तर त्यांच्या पत्नी पल्लवी देसाई यांनी एकदा महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. ताराबाई पार्क या प्रभागातून ते निवडून आले होते. जनसंपर्क व  प्रभागातील विकास कामांना प्राधान्य देणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. माजी नगरसेवक देसाई हे गेले काही दिवस भाजपच्या संपर्कात आहेत. ताराराणी आघाडीकडून ते निवडून आले होते. दरम्यान भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक मातब्बर मंडळी उत्सुक आहेत येथे आठ दिवसात आणखी काही माजी नगरसेवकांचा भाजपा प्रवेश होईल

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes