जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणुका महायुती ताकतीने लढविणार : आमदार चंद्रदीप नरके
schedule31 Dec 24 person by visibility 75 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत ‘करवीर’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील सर्वच मित्रपक्षांनी ताकदीने मदत केल्यानेच माझा विजयी झाला. याची जाणीव ठेवून आगामी पाच वर्षात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम माझ्याकडून होईलच त्याचबरोबर जिल्हा
परिषदेसह सर्व निवडणुका महायुती एकत्रितपणे ताकदीने लढवणार आहे.’असे आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
करवीर राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने आमदार नरके यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे होते. आमदार नरके यांचा सत्कार जांभळे यांच्या हस्ते करण्यात आला. मधुकर जांभळे म्हणाले, राष्ट्वादी कॉग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने आदेश देईल, त्यानुसार मागील विधानसभा निवडणुकीत काम केले. यावेळेला चंद्रदीप नरके यांना आमदार करणारच या इर्षेने आम्ही प्रचारात होतो. भविष्यातील राजकारणाची तमा न बाळगता प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे आगामी काळात शिवसेना व राष्ट्वादी कॉग्रेस ‘करवीर’मध्ये हातात हात घालून काम करेल, एवढी ग्वाही आमदार चंद्रदीप नरके यांच्या वतीने देत आहोत.
तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांनी स्वागत केले. देवबा पाटील (कुर्डू), नामदेव परीट (वडणगे), राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अरविंद कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील, सविता खाडे, युवराज पाटील, दिलीप सावंत, अमर पारमीत, संदीप एकशिंगे, संदीप कांबळे, वसंत पाटील, बाबूराव जांभळे, सुरेश बागडे, रघूनाथ फराकटे, संजय शिपुगडे, सदाशिव पाटील, अमर अणकर,राहुल माने, आकाश सुतार आदी उपस्थित होते. कृष्णात पुजारी यांनी आभार मानले.