शालिनी सिनेटोनमधील राखीव भूखंड हडपण्याचा प्रकार, मनसे आंदोलन करणार
schedule05 Apr 25 person by visibility 32 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शालिनी सिनेटोनमधील पाच व सहा क्रमांकाचे राखीव भूखंड हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळात या जागेचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. यामुळे येथील रेखांकनास मंजुरी देऊ नये, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
शालिनी सिनेटोन परिसरातील रेखांकनास मंजुरी देताना उर्वरित जागा सिनेटोनसाठी राखीव ठेवण्याचे हमीपत्र दिले आहे, तरीही जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे. आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना मागणीचे निवेदन दिले. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, अभिजीत पाटील, नीलेश आजगावकर, अरविंद कांबळे, यतीने होरणे, नीलेश लाड, बाजीराव दिंडोर्ले, संजय चौगुले, सागर साळोखे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. पाच व सहा क्रमांकांचे भूखंड हे सिनेटोनसाठी राखीव आहेत, अन्य कोणत्याही कामासाठी वापर करावयाचा नाही. तसा प्रकार झाल्यास महापालिकेने दिलेली अंतिम रेखांकन मंजुरी रद्द होऊ शकते असे हमीपत्र आहे याकडेही मनसेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले.