Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

आबिटकर नॉलेज सिटीमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

schedule15 Aug 25 person by visibility 40 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :   आबिटकर नॉलेज सिटी येथे देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे प्रमुख भाई आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी इंजिनीअरींग व कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्रा.अर्जुन आबिटकर म्हणाले, देश घडविण्यासाठी योगदान द्यायचे असेल तर बौद्धिक क्षमतेसोबतच शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष द्यायला हवे. विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता हवी. आपला देश हा युवकांचा देश आहे. अभ्यासासोबतच व्यायाम व योगा यांच्यावर लक्ष केंद्रीत करा आणि स्वतःला सक्षम व सुदृढ बनवा असे आवाहन केले. यावेळी इंजिनीअरींग विभागाचे प्राचार्य अमर चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक अजित आबिटकर, श्रीधर भोईटे, विद्याधर परीट, पाल सरपंच सुशिला गुरव, उपसरपंच दिगंबर देसाई, अरुणराव शिंदे, चंद्रकांत चव्हाण, राजाराम भराडे, योगेश पाटील, सागर मिसाळ उपस्थित होते. प्रा.भक्ती भावना, प्रा.पुजा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या दिपाली गोसावी यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes