गोकुळमध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
schedule15 Aug 25 person by visibility 133 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघामध्ये देशाचा ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संघाचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले. यावेळी संचालक किसन चौगले, प्रकाश पाटील, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. गोकुळ प्रकल्पाबरोबरच संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे हस्ते तर लिंगनूर चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, तावरेवाडी चिलिंग सेंटर संचालक बयाजी शेळके, गोगवे चिलिंग सेंटर संचालक कर्णसिंह गायकवाड, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक सुजित मिणचेकर, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी संचालक बाबासाहेब चौगले, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल संचालक मुरलीधर जाधव व बोरवडे चिलिंग सेंटर ज्येष्ठ कर्मचारी अशोक डोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सहायक महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदिप पाटील, व्यवस्थापक (प्रशासन) रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (पशुसंवर्धन) डॉ.प्रकाश साळुंखे, व्यवस्थापक (संकलन) दत्तात्रय वाघरे, डॉ.प्रकाश दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम उपस्थित होते.