महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघाला सर्वसाधारण अजिंक्यपद
schedule12 Feb 25 person by visibility 141 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महावितरणच्या २०२४-२५ च्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाने सर्वच क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. विविध १४ क्रीडा प्रकारात कोल्हापूर संघाने सांघिक व व्यक्तिगत क्रीडा प्रकारात एकूण १४ सुवर्ण व २२ रौप्य पदकांची कमाई केली आहे. कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील एकूण १६४ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला तर यामध्ये ४० महिलांचा समवेश होता.
बारामती येथील विद्यानगरीच्या क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्यात आला होत्या. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ११०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. कोल्हापूर परिमंडलच्या विजेता संघास महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सर्व विजेत्या खेळाडूंचे कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, सांगली मंडलाचे अधीक्षक अभियंता (प्रभारी) सुरेश सवाईराम, पायाभूत आराखडा विभागाच्या अधीक्षक अभियंता पूनम रोकडे, सहायक महाव्यवस्थापक(मानव संसाधन) शशिकांत पाटील, सहायक महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) विजय गुळदगड व इतर अधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या संघाचे मुख्य समन्वयक म्हणून उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी काम पाहिले. सांघिक विजेता : क्रिकेट (पुरुष), टेनिक्वाईट (महिला) . सांघिक उपविजेता* – व्हॉलिबॉल, खो-खो (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष), कॅरम (महिला).
वैयक्तिक खेळांचे निकाल - अनुक्रमे विजेते व उपविजेता पुढीलप्रमाणे - ८०० मीटर धावणे - पुरुष गट - उपविजेता वैभव माने, ४ बाय १०० रिले - पुरुष गट उपविजेता वैभव माने, गोळा फेक - पुरुष गट उपविजेता - इम्रान मुजावर, महिला गट – उपविजेती पूजा ऐनापुरे, थाळी फेक - महिला गट- विजेती ज्योती कांबळे, भाला फेक - पुरुष गट – विजेता अमित पाटील, महिला गट - विजेती अश्विनी जाधव, उंच उडी - पुरुष गट – विजेता सतीश पाटील, महिला गट - उपविजेती अश्विनी देसाई, कॅरम - महिला गट - उपविजेती विजया माळी, टेनिक्वाईट - महिला दुहेरी – विजेती मंजुषा माने, पूजा ऐनापूरे, टेबल टेनिस - पुरुष एकेरी – विजेता अतुल दंडवते, महिला दुहेरी – उपविजेती विदुला पाटील-चैत्रा पै, कुस्ती - ५७ किलो – उपविजेता संभाजी जाधव, ७० किलो – उपविजेता युवराज निकम, ७४ किलो – विजेता गुरुप्रसाद देसाई, ७९ किलो – उपविजेता ज्योतीबा ओऊळकर, ९२ किलो – उपविजेता तुषार वारके, ९७ किलो – उपविजेता हनुमंत कदम आणि १२५ किलो – विजेता प्रमोद ढेरे, ब्रिज- उपविजेता अभिषेक बारापहे-विजय पवार, शरीर सौष्ठव - ६५ किलो –७० किलो – विजेता अमित पाटील, ७५ किलो – विजेता प्रवीण घुनके, ८० किलो – विजेता -राहूल कांबळे, ९० किलो – उपविजेता गौरव पोवार, ९० किलो+ - विजेता सलमान मुंडे व उपविजेता नागेश चौगुले, पॉवर लिफ्टींग -७४ किलो- उपविजेता सागर जगताप, ८३ किलो- उपविजेता प्रवीण घुनके, १०५ किलो- उपविजेता नागेश चौगुले.