स्टार एअरची २८ ऑक्टोबरपासून कोल्हापूर –अहमदाबाद विमानसेवा
schedule25 Oct 24 person by visibility 794 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्टार एअरतर्फे २८ ऑक्टोबर २०२४ पासून कोल्हापूर –अहमदाबाद विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. ही विमानसेवा प्रवाशांना, तसेच व्यावसयिक, पर्यटकांना लाभदायक ठरेल. या विमानसेवेमुळे प्रवासाचा वेग कमी होऊन प्रादेशिक, व्यापार, वाणिज्य आणि पर्यटनाला चालना मिळेल असे स्टार एअरचे सीईओ कॅप्टन सिमरनसिंग तिवाना यांनी म्हटले आहे. आठवडयातून चार दिवस कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेची सोय आहे. सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी या चार दिवशी विमानसेवेचा लाभ घेता येईल.
या विमानसेवेची तिकिटे स्टार एअरच्या वेबसाइटवर www.starair.in वर उपलब्ध आहेत. याशिवाय प्रारंभिक बुकिंगसाठी आकर्षक दरही ऑफर केले आहेत. कोल्हापुरातून सकाळी अकरा वाजता विमान उड्डाण करेल. एक तास वीस मिनिटाचा प्रवास आहे. दुपारी बारा वाजून २० मिनिटाला अहमदाबादला पोहोचेल. अहमदाबादहून दुपारी बारा वाजून ५० मिनिटाला विमान कोल्हापूरकडे झेपावेल. दुपारी दोन वाजून दहा मिनिटाला कोल्हापुरात विमान पोहोचेल. ‘कोल्हापूर आणि अहमदाबाद ही सांस्कृतिकदृष्या समृद्ध शहरे आहेत.ज्यांचे आर्थिक महत्व वाढत आहे. हा विमान प्रवास सुलभ राहील.दोन्ही प्रदेशातील आर्थिक विकास व पर्यटनाला चालना मिळेल.’असे स्टार एअर व्यवस्थापनने म्हटले आहे.स्टार एअर हा संजय घोडावत समूहातंर्गत आहे. स्टार एअर हा देशातील प्रमुख राष्ट्रीय विमान वाहक आहे. ’