जलतरण स्पर्धेमध्ये केआयटीला सर्वसाधारण विजेतेपद
schedule31 Dec 24 person by visibility 92 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज् वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ विभागीय व अंतर विभागीय जलतरण कोल्हापूर येथील स्पर्धा शाहू कॉलेज, कोल्हापूर यांनी आयोजित केल्या होत्या. स्पर्धेत केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे.
पृथ्वीराज सासणे, इंद्रजीत परमेकर, ओंकार इंगळे, चिन्मय जोशी या विद्यार्थ्याच्या संघाने हे घवघवीत यश मिळवले स्पर्धेत सहभागी असलेल्या खेळाडूंचे अभिनंदन महाविद्यालयाचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले. सोबत मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर,अधिष्ठाता विद्यार्थी उपक्रम डॉ.जितेंद्र भाट, शारीरिक शिक्षण संचालक विजय रोकडे उपस्थित होते. खेळाडूंना संस्थेचे चेअरमन साजिद हुदली, व्हाईस चेअरमन सचिन मेनन, सेक्रेटरी दीपक चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले.