तेजस्विनी कदमचे जल्लोषी मिरवणूक
schedule02 Oct 24 person by visibility 176 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धा इटली या ठिकाणी स्पर्धेसाठी भारतीय रोलर डरबीचा संघ पाठवण्यात आला होता. त्या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात चीन बरोबर विजय मिळवून कास्यपदक मिळवले होते. या कांस्यपदक मिळवलेल्या भारतीय संघात कोल्हापूरच्या तेजस्विनी कदमने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तिला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणूनही बहुमान मिळाला होता. तिचे इटलीहून कोल्हापुरात आगमन होताच जल्लोषी स्वागत करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा स्केटिंग संघटनेतर्फे स्वागत झाले. यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीमती शांताबाई अभिमन्यू कदम या उपस्थित होत्या. त्याचबरोबर जिल्हा संघटनेच्या वतीने अध्यक्ष अनिल कदम.ॲड.धनंजय पठाडे, संयुक्त जुना बुधवार पेठतर्फे अमोल डांगे. शशिकांत जाधव. पंडित डांगे.विश्वास पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब मुधोळकर. निलेश हंकारे यांच्या हस्ते तिचे स्वागत झाले.
दसरा चौकातून जुना बुधवार पेठपर्यंत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. रॅलीचे जुना बुधवार पेठेमध्ये माजी उपमहापौर दिगंबर फराकटे व अविनाश साळुंखे यांच्या हस्ते स्वागत करून रॅलीची सांगता करण्यात आली. तेजस्विनीला आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉ महेश अभिमन्यू कदम व राष्ट्रीय कोच भास्कर अभिमन्यू कदम.यांचे प्रशिक्षण लाभले