Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केआयटीत विशेष इंडक्शनने प्रथम वर्षाला प्रारंभभुयेवाडी-सादळेमादळे रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा, राष्ट्रवादीतर्फे अजित पवारांना निवेदनगोकुळच्या जाजम-घडयाळ खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती, पंधरा दिवसात अहवाल सादर होणारशिये फाटा येथे गोळीबार, संभापूरचा तरुण पोलिसांच्या ताब्यातथेट पाईपलाईन योजना म्हणजे कोल्हापूरच्या माथी मारलेला पांढरा हत्ती, सतेज पाटलांनी कोल्हापूरकरांची माफी मागावीखाजगी शिक्षक पतसंस्थेची मोबाईल बँकिंग सुविधा आदर्शवतवारणा विद्यापीठाच्या खेळाडूंची बास्केटबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडप्राथमिक शिक्षण विभागात गतीमान कामाचा धडाका, वर्षभरात ५७० जणांना पदोन्नती !करनूरमध्ये होणार दिव्यांग पुनर्वसन केंद्र ! मंगळवारी भूमिपूजन समारंभ !! सत्ताधाऱ्यांचे ऐकून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून थेट पाइपलाइन योजनेत अडथळे-काँग्रेसच्या नगरसेवकांचा आरोप

जाहिरात

 

हाती नोकरीची ऑर्डर, मोबाईलवर वडिलांच्या मृत्यूचा मेसेज ! सीईओंनी दिला शिक्षकाला आधार

schedule27 Jun 24 person by visibility 10178 categoryशैक्षणिक

  आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : हाती नोकरीची ऑर्डर, जीवनातील अत्यानंदाचा क्षण आणि नेमके त्याच वेळी मोबाईलवर मेसेज आला वडिलांचे मृत्यू झाल्याचा.  मन सुन्न करणारे ही घटना. जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरणक हा शिक्षकाला गुरुवारी एकाच वेळी हसू आणि आसू अशा स्थितीला  सामोरे जावे लागले. या कठीण काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी त्या शिक्षकाला मानसिक आधार दिला. पद व अधिकारपदाची झूल बाजूला ठेवत माणुसकीचे दर्शन घडविले. त्या शिक्षकाचे सात्वंन केले. त्या शिक्षकाला, वडिलांच्या अंत्यदर्शनाला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था ही केली.
 सीईओंच्या या संवेदनशील आणि माणुसकीच्या वृत्तीचे दर्शन मुलाखतीसाठी आलेल्या उपस्थित शिक्षकांच्या मनालाही भावले.   कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत गुरुवारी 27 जून रोजी सर्किट हाऊस येते शिक्षक भरतीची प्रक्रिया आयोजित केली होती. पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापनासाठी बोलावले होते. समुपदेशनाने पदस्थापना करण्यात येत आहे. 
   समुपदेशन द्वारे पदस्थापनेची प्रक्रिया सुरू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शिक्षक हरीभाऊ दिगंबर विरणक यांच्या वडिलांचे निधन झाले असा मेसेज आला. शिक्षक विरणक यांना तर काही सुचेना. वडिलांच्या निधनाच्या वार्तेने धक्का बसलेला. दूरवर गाव. दुसरीकडे शिक्षक म्हणून पदस्थापना मिळणार होती. हातात नोकरीची ऑर्डर होती.  त्यांनी सभागृहाबाहेरील अधिकाऱ्यांना, वडिलांच्या निधनाची कल्पना दिली. अधिकाऱ्यांनी तत्काळ, सीईओ कार्तिकेयन यांना कळविले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस हे त्या शिक्षकाला भेटण्यासाठी झटकन सभागृहाबाहेर आले.   सीईओना पाहताच त्या शिक्षकाला अश्रू अनावर आले. सीईओंच्या खांद्यावर डोकं ठेवत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. सीईओंनी त्या शिक्षकाचे सांत्वन केले. धीर दिला. आणि त्या शिक्षकांना स्वतःच्या गाडीतून पोहचविण्याचे नियोजन केले. स्वतः त्या शिक्षकाला घेऊन गाडीपर्यंत गेले. ड्रायव्हरला सूचना केल्या. पुढे त्याच्या पदस्थापननेची प्रक्रिया पूर्ण केली. मनाला चटका लावणारी ही सारी घटना. दरम्यान सीईओ  कार्तिकेयन एस यांनी दाखविलेली संवेदनशीलता, माणुसकी आणि  तत्परता या साऱ्या गोष्टी मात्र उपस्थित शिक्षकांना मनापासून भावल्या. जिल्हा परिषदेच्या तरुण अधिकाऱ्याच्या माध्यमातून समजंस पालकत्व लाभल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes