जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला
schedule18 Nov 24 person by visibility 41 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर रविवारी (१७ नोव्हेंबर) रात्री हल्ला झाला. घोरपडे हे प्रचार संपवून कोल्हापूरला परत येत असताना मनवाडजवळ रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हल्लेखोरांनी त्यांच्या मोटारीवर हल्ला चढविला. मोटारीवर दगडफेक व धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. घोरपडे यांच्यावर कोल्हापुरात खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या हल्लाप्रकरणी कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.