दिग्गज कलाकारांचा सिनेमा आतली बातमी फुटली प्रेक्षकांच्या भेटीला
schedule22 Aug 25 person by visibility 119 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठीतील प्रसिद्ध कलाकारांची फौज, आशय आणि सादरीकरणात वेगळेपण असलेल्या ‘आतली बातमी फुटली’हा सिनेमा १९ सप्टेंबर २०२५ पासून प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनासाठी कलाकारांची टीम कोल्हापुरात आली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सिनेमा साऱ्यांचे मनोरंजन करणारा आहे. प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन केले. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांनी हा सिनेमा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या सिनेमाची कथा एका खुनाच्या सुपारीच्या रहस्यभेदाभोवती फिरते. सिनेमाच्या पडद्यावर ती अतिशय रंजकपणे उलगडली आहे. ही कथा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजावणी ठरेल असा विश्वास अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले. या सिनेमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे दिग्गज कलाकारांचा अभिनय. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, रोहिणी हट्टगंडी यांच्या भूमिका आहेत. या सिनेमात विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर हे कलाकार आहेत.