गोकुळतर्फे महाराष्ट्र दिन-कामगार दिन साजरा
schedule02 May 25 person by visibility 50 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे एक मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. कॉम्रेड उमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी कॉम्रेड सूर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत व मुंबई शहराच्या जडण-घडणीमध्ये कामगारांनी अतुलनीय योगदान दिले आहे. गोकुळ दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपली असून या सगळ्याचे श्रेय गोकुळ दूध संघाशी संलग्न असणारे दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, वाहतूकदार व सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोकुळचा कर्मचारी वर्गाचे आहे. कामगारांनी त्यांचे कर्तव्य प्रामणिकपणे पार पाडून संस्था वाढीसाठी प्रयन्न करावे.’
कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांच्या हस्ते कॉम्रेड सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. कॉम्रेड संदेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. शाहीर सदाशिव निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (खरेदी) मोळक, विभाग प्रमुख (स्टोअर) सुनिल कारंडे, अध्यक्ष कॉम्रेड मल्हार पाटील व्ही.डी.पाटील, लक्ष्मण पाटील, अशोक पुणेकर, दत्ता बच्चे, संदेश पाटील, संभाजी शेलार, लक्ष्मण आढाव, योगेश चौगुले, कृष्णा चौगुले उपस्थित होते.