पाच वर्षे संधी द्या, त्या संधीचे सोने करुन दाखवेन -राजेश लाटकर
schedule18 Nov 24 person by visibility 49 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्यामुळे उत्तरच्या मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. ज्या जनतेबरोबर मी गेली २५ वर्षे आहे त्यांचाच आशीर्वाद मला विजयपथाकडे घेऊन जाईल. तुम्ही राजेश क्षीरसागर यांना १५ वर्षे सत्ता दिली, आता मला ५ वर्षे संधी देऊन पहा. तुमच्या सहकार्याने संधीचे सोने करेन अशी ग्वाही राजेश लाटकर यांनी दिली.
महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी येथील विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लाटकर म्हणाले, जनतेच्या मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे माझा विजय निश्चित आहे. हा विजय माझा नाही तर गोरगरीब जनतेचा असेल, आमदार आपल्या दारी असा उपक्रम राबवून आपल्या समस्यांचे निवारण तर करीनच शिवाय येथील मैदानाचाही प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे अभिवचन या विशाल जनसमुदायासमोर देतो.असे ते म्हणाले. माझ्याकडून कधीही महिलेला मारहाण, बिल्डरला मारहाण, डॉक्टर, अधिकाऱ्यांना धमकाविणे असे प्रकार होणार नाहीत.
‘धनंजय महाडिकांनी मुलासाठी स्वतःच्या पाहुण्याचा केसाने गळा कापला. ’ असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केला. राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्वाची अशी ही निवडणूक आहे. ही निवडणूक महाराष्ट्र धर्म म्हणजेच शिव-शाह-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेला वाचवण्याची लढाई आहे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा लढा आहे. म्हणूनच उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांना निवडून द्या. माजी महापौर भीमराव पोवार, माजी नगरसेवक भारती पोवार, तौफिक मुल्लानी यांच्यासह आपचे संदीप देसाई, कॉ. अतुल दिघे, कॉ. रघुनाथ कांबळे, कॉ. सतीशचंद्र कांबळे, उदय फाळके, राजेंद्र आत्याळकर, संभाजी खवरे, संयुक्ता घाटगे, सीमा भोसले, दिपकसिंह पाटील, निलेश भोसले, उज्वला चौगुले, तात्यासो पाटील, बाजीराव जाधव, लक्ष्मण जानकर, दिलीप पवार उपस्थित होते.