गुजरीतील छोटे दुकान ते शिरोलीत दागिने उत्पादन कारखाना
schedule26 Oct 25 person by visibility 32 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : गुजरीच्या गल्लीत एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित दागिन्यांच्या कंपनीने आपल्या अत्याधुनिक दागिन्यांच्या निर्मिती युनिटचे भव्य उद्घाटन शिरोली येथे करण्यात आले.
राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग स्थापना १९७३ मध्ये हंजारीमलजी राठोड यांच्या पुढाकाराने झाली होती. व्यवसायाची सुरुवात राठोड परिवाराचे कुटुंबप्रमुख हंजारीमलजी राठोड यांनी गुजरी येथून एका छोट्या दुकानातून केली, पुढे जाऊन प्रतिभा नगर मध्ये दागिने मॅन्युफॅक्चरिंग करिता एक छोटा कारखाना सुरू केला, त्यापुढे चंद्रकांत राठोड यांनी शिरोली येथे एका छोट्या युनिटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग चे काम वाढवत सुरू ठेवले, आणि त्यापुढे जयपुर मध्ये (राजस्थान) येथे त्यांनी अजून एक अत्याधुनिक जयपूरची राजस्थानी ट्रेडिशनल ज्वेलरी बनवण्याचा कारखाना देखील सुरू केला आहे.
गेल्या पाच दशकांपासून उत्कृष्ट गुणवत्ता, विश्वासार्हता आणि नवकल्पनांमुळे राठोड ज्वेलर्स हे नाव दागिन्यांच्या जगतात अग्रस्थानी राहिले आहे.
नवीन ज्वेलरी उत्पादन कारखान्याच्या उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर , खासदार धनंजय म्हाडीक , खासदार धैर्यशील माने , आमदार श सतेज पाटिल , आमदार राहुल अवाडे , माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हा पोलिसअधीक्षक योगेश गुप्ता, मालाबार गोल्डचे व्हॉइस प्रेसिडेंट के. पी. अब्दुल सलाम, सुरेश जैन यांची उपस्थिती होती.
राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींगचे मॅनेजिंग डायरेक्टर चंद्रकांत राठोड, पत्नी रूपाली , कन्या रीवा , चिरंजीव हीद्रय अभिनंदन केले. गुजरीमधील छोट्या दागिन्यांच्या कारखान्यापासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरवठादार कंपनीपर्यंतच्या या यशस्वी वाटचालीवर मान्यवरांनी प्रकाश टाकला.
पालकमंत्री आबिटकर यांनी राठोड यांनी छोट्याशा दुकानातून सुरू केलेला व्यवसाय हा आता नवीन कारखान्याच्या रूपाने पुढे आला आहे, अथक परिश्रमातून राठोड कुटुंबियांनी आपला व्यवसाय वृद्धिगत केला. खासदार धनंजय महाडिक यांनी चंद्रकांत राठोड यांचे कोल्हापूर मध्ये नवीन अत्याधुनिक मशिनरी सह दागिने बनवण्याचा मॉर्डन कारखानासुरू एक मोठे युनिट आज पासून सुरू होत आहे. ही कोल्हापूरच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात पुढे आहे तसेच आता दागिन्याच्या बाबतही राठोड यांच्यामुळे आणखी पुढे येणार असून राठोड यांनी कला दाखविण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे.राठोड कुटुंबातील तिसरी पिढी रीवा आणि ह्रदय यांनी आपल्या कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तुंग भरारी घेतली असल्याचे नमूद केले. चंद्रकांत राठोड यांनी आभार मानले.