खासदार निलेश लंकेच्या पुढाकारातून रविवारी भुदरगड स्वच्छता मोहीम
schedule25 Oct 25 person by visibility 36 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून रविवारी 26 ऑक्टोबर 2025 रोजी भुदरगड किल्ला येथे स्वच्छता मोहीम आयोजित केले आहे. खासदार शाहू महाराज व काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी नऊ वाजता स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिली.
खासदार लंके हे दर महिन्याला एका गड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत आहेत. आज पर्यंत त्यांच्या पुढाकारातून शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोणा, प्रतापगड व विश्रामगड या गडांची स्वच्छता मोहीम राबवली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून खाखासदारलंके 26 ऑक्टोबर 2025 रोजी भुदरगड किल्ल्यावर पोहोचत आहेत सकाळी ९ वाजता स्वच्छता मोहिमेला सुरुवात होईल.
भुदरगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३२०८ फूट (९७७ मीटर) उंचीवर आहे. किल्ल्याची लांबी २६०० फूट आणि रुंदी २१०० फूट आहे. या ऐतिहासिक किल्ल्याच्या स्वच्छतेचा विडा खासदार लंके यांनी उचलला आहे. या मोहिमेत गडप्रेमी, तरुण मंडळे, तालीम संस्था व सर्व पक्षांचे कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावेअसे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, सरचिटणीस सुनील देसाई उपस्थित होते.