शाश्वत प्रतिष्ठानतर्फे वारी परिवारचे स्वागत
schedule25 Oct 25 person by visibility 57 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील शाश्वत प्रतिष्ठानतर्फे वारी परिवार सायकल क्लब मंगळवेढा यांच्या शेतकरी राजाच्या सन्मानार्थ आयोजित मंगळवेढा ते पन्हाळगड या सायकल मोहिमेचे दसरा चौक कोल्हापुर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा शुभांगी गावडे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे स्मृतिचिन्ह व झाडाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरेकर फौडेशनचे अध्यक्ष अश्कीन आजरेकर हे होते.यावेळी बोलताना सचिवा शुभांगी गावडे यांनी अशा मोहिमांमधून समाज प्रबोधनाच्या कार्याबरोबरच इतिहास आणि निसर्ग संवर्धनाचे कार्य साधले जाते,अशा स्तुत्य उपक्रमास नेहमीच आपला पाठिंबा राहील असे मत व्यक्त केले. यावेळी वारी परिवारचे प्रा विनायक कलुबर्मे यांनी परिवाराच्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन शाश्वत प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ गुरुदत्त म्हाडगूत, उपाध्यक्ष राहुल चौधरी, संचालक डॉ धीरज शिंदे, संतोष परब, सुमित जामसांडेकर, नरेश पांचाळ, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, डॉ सुनिल भोसले, डॉ प्रदीप पाटील, प्रा मधुकर पाटील उपस्थित होते.