सोमवारी कोल्हापुरातील सी - डी वार्डातील पाणीपुरवठा बंद
schedule25 Oct 25 person by visibility 89 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोकणेमठ पाण्याच्या टाकीला जोडलेल्या 16 इंची पाईपलाईनवर धोत्री गल्ली (धोत्री मटण शॉप समोर) येथे अचानक मोठ्या प्रमाणात गळती उद्भवली आहे. त्यामुळे शहरातील सी व डी वॉर्ड भागातील पाणीपुरवठा सोमवारी 27 ऑक्टोबर 2025 रोजी बंद राहणार आहे. गळती काढण्याचे काम पाणीपुरवठा विभागामार्फत सोमवारी हाती घेण्यात येणार आहे. या पाईपलाईन वर अवलंबून असलेल्या भागांमध्ये सोमवारी गळती काढण्याच्या कामामुळे दैनंदिन पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवार 28 ऑक्टोंबर 2025 रोजी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.
दरम्यान या पाईपलाईन वर अवलंबून असणाऱ्या डी वॉर्ड बुरुड गल्ली, विठ्ठल मंदिर, अवधूत गल्ली, डंगरी गल्ली, ज्ञानेश्वर मंडप, हळदकर हॉल परिसर, टेबलाई, मरगाई गल्ली, जुने विवेकानंद कॉलेज परिसर, जुनी बुधवार पेठ, ब्रम्हपुरी, तोरस्कर चौक, सी वॉर्ड राजेबागेस्वार परिसर, डी वॉर्ड निलेश हॉटेल परिसर, परिट गल्ली, नष्टे गल्ली, शनिवारपेठ, भगतसिंग चौक परिसर, नरसोबा सेवा मंडळ परिसर, धडंगी बोळ (पापाची तिकटी जवळ), माजगांवकर पॅसेज, कलकुटकी गल्ली, गंवडी मोहल्ला, कैसापूर पेठ तसेच सी.पी.आर. रुग्णालय परिसर भागात सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.