दाजीपूर अभयारण्यमध्ये शुक्रवारपासून जंगल सफारी
schedule23 Oct 25 person by visibility 25 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटन जोमात सुरू असतांना , कोल्हापूर जिल्ह्यातील रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर (राधानगरी) अभयारण्य सफारीसाठी शुक्रवार, २४ ऑक्टोंबर २०२५ पासून सुरू होत आहे. वन्य जीव विभागाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. अभयारण्य जंगल सफारीसाठी सुरू करावे यासाठी गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या मागणीला यश आले आले. दाजीपूर अभयारण्य बंद असल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि जीप चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी राज्यातील इतर पर्यटनस्थळे पूर्ण क्षमतेने सुरू असतांना , कोल्हापूरच्या पर्यटनाची 'लाईफलाईन' असलेले दाजीपूर अभयारण्य बंद ठेवणे अन्यायकारक असल्याचे नमूद केले. त्यांनी वन विभागाने जंगल सफारी तात्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान शुक्रवारपासून जंगल सफारी सुरू होणार असल्याने स्थानिक व्यापारी, जीप चालक आणि पर्यटन क्षेत्रातील इतर घटकांनी वन्यजीव विभागाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे