Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खासदार निलेश लंकेच्या पुढाकारातून रविवारी भुदरगड स्वच्छता मोहीमशाश्वत प्रतिष्ठानतर्फे वारी परिवारचे स्वागतसोमवारी कोल्हापुरातील सी - डी वार्डातील पाणीपुरवठा बंदशहीद महाविद्यालयात रंगला यूथ फेस्टिव्हलमधील विजेत्या विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा20 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत गोकुळश्री स्पर्धाडी वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव, 90 वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजराकोल्हापुरात आपुलकीचा फराळ !दाजीपूर अभयारण्यमध्ये शुक्रवारपासून जंगल सफारीखाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे शून्य टक्के व्याजदराने ई-बाइकचे वितरणरांगडे कोल्हापूर…हटके स्पर्धा ! दुचाकी चालवित नेतेमंडळींनी वाढविला उत्साह!!

जाहिरात

 

शहीद महाविद्यालयात रंगला यूथ फेस्टिव्हलमधील विजेत्या विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा

schedule25 Oct 25 person by visibility 52 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईतर्फे आयोजित युथ फेस्टिवलमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापुरातील बांधकाम व्यवसायिक उत्तम फराकटे यांच्या हस्ते व संस्थेचे मुख्य मार्गदर्शक जगन्नाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला.

 प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बांधकाम व्यवसायिक फराकटे म्हणाले, "शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी या जगाशी भिडणाऱ्या, आत्मविश्वासू आणि कर्तृत्ववान आहेत. त्यांच्या जिद्दी, मेहनती आणि कलागुणांमुळे  नवी दिशा मिळत आहे."

         संस्थेचे मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ पाटील यांनी, " शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केवळ स्थानिक नव्हे तर जागतिक पातळीवर आपले अस्तित्व निर्माण करावे. त्यांच्या कलागुणांनी आणि जिद्दीने महाविद्यालयाचे नाव अभिमानाने उजळवावे. प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्यातील कलेला ओळखून ती जगापर्यंत पोहोचवावी, हेच खरे शिक्षणाचे यश असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, कॉलेज जीवन हा केवळ अभ्यासाचा काळ नसून, तो स्वतःला शोधण्याचा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रवास आहे.एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ आयोजित प्रादेशिक युवा महोत्सवात शहीद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी 26 हून अधिक कलाप्रकारांमध्ये यश संपादन केले. या विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.  मध्यवर्ती युवा महोत्सवातही 15 हून अधिक कलाप्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थिनींनी आपले वर्चस्व सिद्ध केले.प्रादेशिक युवा महोत्सवात लिटरेचर, डान्स आणि थिएटर इव्हेंट्समध्ये जनरल चॅम्पियनशिप पटकावले.  मध्यवर्ती युवा महोत्सवातील लिटरेचर इव्हेंटमध्येही जनरल चॅम्पियनशिप मिळवून विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचा लौकिक आणखी वाढवला. यावेळी एस.एन.डी.टी. आयोजित क्रीडा महोत्सवात खो-खो या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनींचाही विशेष सत्कार करण्यात आला.

 प्राचार्य प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक म्हणून प्रा. दिग्विजय कुंभार यांनी  भूमिका पार पाडली. प्रा. तेजस्विनी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शुभांगी भारमल यांनी आभार मानले. यावेळी सूर्यकांत जांभळे, उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. विशालसिंह कांबळे, प्रा. सिद्धता गौड उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes